Home वायरल फराळे गावात आग लागून गोठा जळून खाक

फराळे गावात आग लागून गोठा जळून खाक

3 second read
0
0
1,422

राधानगरी तालुक्यातील फराळे या गावात रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागून बाबुराव बळवंत पाटील यांचा गोठा जळून खाक झाला या भीषण आगीत सहा म्हशींचा जागीच मृत्यू झाला. तर एक म्हैस गंभीर अवस्थेत आहे.. अचानक लागलेल्या या आगीमुळे गोठ्यासह साडेदहा लाखांचे नुकसान झाले आहे.. आगीत होरपळून मेलेल्या जनावरांची बातमी ही काळजाला चटका लावून जाणारी आहे.

ही बातमी ऐकताच गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी पाटील कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना गोकुळ संघ सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन दिल.. तसेच सदर उत्पादकांना उभा करण्यासाठी आपण सर्वजण पुढाकार घेऊन आर्थिक मदत करूयात असं आवाहन केलं. त्यावेळी गावातील बऱ्याच लोकांनी पुढाकार घेऊन या कुटुंबाला आर्थिक मदत केली.. यावेळी जयवंत डवर ,विलास डवर, प्रकाश वंजारी ,यशवंत सुतार, बंडोपंत सुतार ,मसु केने, जयवंत सुतार गोकुळ विस्तार अधिकारी कृष्णात फराकटे, नंदू रानमाळे, मुकुंद पताडे ,अभिजीत पाटील गोकुळ संचालक प्राध्यापक किसनराव चौगुले, सुरेश पाटील लक्ष्मण गिरी गोकुळ सुपरवायझर अभिजीत पाटील इत्यादींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली…

कोल्हापूर कारभारासाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…