Home Uncategorized बहुजनांच्या विकासासाठी वंचित आघाडी वाढवूया : विलास कांबळे..

बहुजनांच्या विकासासाठी वंचित आघाडी वाढवूया : विलास कांबळे..

4 second read
0
0
1,271

कुडित्रे या.करवीर येथे बहुजन वंचित आघाडी च्या शाखेचे उद्घाटन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे (माजी समाजकल्याण सभापती) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनिअर शिवाजी कुंभार होते. स्वाभिमानी बाणा असलेल्या व बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाणा-या आघाडीत बहुसंख्येने सहभागी होऊया असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी रणजीत भास्कर यांनी प्रास्ताविकेत वंचित आघाडीची शाखा स्थापन करण्याचा हेतू स्पष्ट केला. बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा जपण्यासाठी वंचित आघाडीच्या पाठीशी राहूया व गटा तटाच्या राजकारणापासून दूर राहून आघाडीशी एकसंध होऊया असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी, पुंडलिक कांबळे, संभाजी ज्ञानू पाटील (माजी चेअरमन कुंभी कासारी कारखाना) यांनी मनोगते व्यक्त केलीत. या कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी शेलार उपसरपंच अजित पाटील, ग्रा.पं सदस्य तुकाराम शेलार, राजाराम कदम, विशाल खेडकर, सुवर्णा भास्कर इ.मान्यवर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्ष वेधून घेण्यासारखी होती. संयोजन शाखाध्यक्ष दिलीप भास्कर उपाध्यक्ष पंडित भास्कर, सेक्रेटरी पी.एस.भास्कर,धनाजी आ भास्कर, बाजीराव भास्कर यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू राऊत तर आभार रणजीत भास्कर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…