Home Uncategorized जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी राधानगरी तहसीलदार कार्यालयातील 55 कर्मचारी आज पासून बेमुदत संपावर…

जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी राधानगरी तहसीलदार कार्यालयातील 55 कर्मचारी आज पासून बेमुदत संपावर…

2 second read
0
0
584

राधानगरी तहसील कार्यालयातील कर्मचारी जुन्या पेन्शन मागणीसाठी आज पासून बेमुदत संपावर गेले आहेत.

राधानगरी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार 1, सहाय्यक महसूल कर्मचारी 10, अव्वल कारकून 5,तलाठी 32 ,मंडल अधिकारी 6, शिपाई 1 असे एकूण 55 कर्मचारी आज पासून बेमुदत संपावर असल्याने कार्यालय रिकामे असल्याचे पाहायला मिळत होते.

तालुक्यातील शासकीय कामासाठी येणारी जनता तहसील कार्यालयातील कर्मचारी संपामुळे नाराज होऊन परत गेली आहे. तरी शासनाने जुनी पेन्शन लवकरात लवकर लागू करून प्रश्न सोडवावा अशी मागणी तालुक्यातील जनतेमध्ये होत आहे.

केके न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…