Home Uncategorized प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा

प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा

4 second read
0
0
87

मलकापूर- पेरिड येथील रयत शिक्षण संस्थेचे, प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात रेड रिबन क्लब, मलकापूर यांच्या सहकार्याने 05 डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व प्राणीशास्त्र विभाग यांच्या वतीने एड्स रॅली व एड्स जनजागृती विषयक शपथ वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापकांनी एड्स दिनानिमित्त शपथीचे सामूहिक वाचन केले. त्यानंतर एच.आय.व्ही./ एड्स जनजागरण प्रबोधन रॅली काढण्यात आली.

सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार आयोजित करण्यात आले. श्री. क्रांतिसिंह चव्हाण, श्री. चंद्रकांत गायकवाड, प्रा. डॉ. सत्यवान बनसोडे प्रा. प्रमोद नाईक प्रा. डॉ. एन. के. कांबळे आदींनी एड्स दिनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तसेच प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…