Home Uncategorized प्रा. आरोग्य केंद्र निवडेचे वैद्यकीय अधिकारी बळवतकर यांची तात्काळ बदली करा…

प्रा. आरोग्य केंद्र निवडेचे वैद्यकीय अधिकारी बळवतकर यांची तात्काळ बदली करा…

3 second read
0
0
121

आरोग्य केंद्रामध्ये महिला रुग्णांना अपमानास्पद वागणूक देणे ,अरेरावीची भाषा करणारे, आरोग्य केंद्रात रुग्णांची अश्लील व्हिडिओ ,चित्रफित बनवणारेप्राथमिक आरोग्य केंद्र निवडे येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बळवतकर याची तात्काळ बदली करा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा प्रहार गगनबावडा तालुका संघटनेच्या वतीने देण्यात आला.डॉ.बळवतकर यांच्या कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यांच्या बद्दल महिला वर्गामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्यामुळे भविष्यात हा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन बळवतकर यांची बदली करावी अन्यथा येणाऱ्या काही दिवसातच की प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे येथे बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड यांना प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक बळवतकर यांच्या बदली संदर्भात निवेदन गगनबावडा प्रहार तालुकाप्रमुख संजय भिकाजी म्हेतर आरोग्य विभाग प्रमुख ज्ञानेश्वर शिरावडेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अरुण डाकवे, सुनील म्हेतर ,अभिजीत पाटील ,श्रीकांत पाटील ,सुहास गायकर हे उपस्थित होते.

गगनबावडा प्रतिनिधी महादेव कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…