Home Uncategorized नाम.चंद्रकांतदादा पाटील वैद्यकीय कक्षाच्यावतीने महिनाभरात रु. 22 लाख निधी वितरीतरुग्णांच्या नातेवाईकांना जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

नाम.चंद्रकांतदादा पाटील वैद्यकीय कक्षाच्यावतीने महिनाभरात रु. 22 लाख निधी वितरीतरुग्णांच्या नातेवाईकांना जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

5 second read
0
0
343

कोल्हापूर दि.२७ नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथे गरजू रुग्णांना दिलासा देण्याच्या उद्देशाने वैद्यकीय सहायता कक्ष कार्यरत आहे. या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया, औषधे, शासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या कडून वैद्यकीय मदत प्राप्त करून दिली जाते. मुख्यमंत्री सहायत्ता निधीच्या माध्यमातून आजपर्यत अनेक रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा यामुळे मिळाला आहे.
दिनांक ०१ जुलै २०२३ ते २७ जुलै २०२३ पर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधीतून २० रुग्णांना १९,७०,०००/- सिद्धीविनायक गणपती मंदिर ट्रस्ट मुंबई निधीतून ६ रुग्णांना १,३५,०००/- महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेतून ३ रुग्णांना १,९२,०००/- असा एकत्रित २२ लाख ९७ हजार इतका निधी नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या वैद्यकीय कक्षाच्या मार्फत गरजू रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळवून दिला आहे.
आज कोल्हापूर जिल्ह्यातील मीना बुवा यांना (नवजात बालक), लौकिक यादव (लिव्हर ट्रान्सफर), राहुल तिवडे (ब्लड कॅन्सर), स्नेहा वाघमारे (अपघात विकार), प्रवीण देवेकर (तोंडाचा कॅन्सर), दीपक चव्हाण (मेंदूवरील शस्त्रक्रिया) या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्कम रुपये ७ लाखांच्या (एकत्रित) निधीच्या प्रमाणपत्राचे वितरण भाजपा नूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्याहस्ते करण्यात आले.
वैद्यकीय कक्षाच्यावतीने राहूल चौगले, प्रथमेश पाटील, आकाश दळवी, हिंदुराव पाटील, विजय पाटील, श्रीधर गुरव यांनी काम पाहिले.
तरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…