Home Uncategorized मनसेतर्फे शाहूवाडीतील आश्रम शाळेत फळांचे वाटप

मनसेतर्फे शाहूवाडीतील आश्रम शाळेत फळांचे वाटप

4 second read
0
0
83

शाहूवाडी

.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज 14 जून 2022 रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून, आज शाहूवाडी मधील केंद्रीय अनुसूचित जाती अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रम शाळा,शाहुवाडी येथे मनसेचे कामगार सेना रायगड जिल्हा सह चिटणीस जयसिंग पाटील, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांच्या सहकार्याने,शाहूवाडी मधील आश्रम शाळेमध्ये राहत असणाऱ्या मुला मुलींसाठी फळे वाटप करण्यात आली.
यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद गगनात मावत नव्हता, असे हे क्षण निर्माण झाले होते. मनसेचे पदाधिकारी यांच्याशी मुलांनी संवाद साधला यावेळी मनसेचे शाहूवाडी तालुक्यातील उपस्थित- तालुका सचिव रोहित जांभळे, परेश सातपुते, सचिन पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…