Home Uncategorized मनसेचे जयसिंग पाटील यांची कामगार सेनेच्या राज्य चिटणीस पदी नियुक्ती

मनसेचे जयसिंग पाटील यांची कामगार सेनेच्या राज्य चिटणीस पदी नियुक्ती

4 second read
0
0
56

शाहूवाडी

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील कोळगाव या मूळ गावातील असलेले, जयसिंग बळवंत पाटील यांची मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी राज ठाकरे यांच्या आदेशाने महेश जाधव (उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य मनसे व अध्यक्ष- मराठी कामगार सेना) यांच्यामार्फत नियुक्ती करण्यात आली.

शाहूवाडी तालुक्यातील गंभीर प्रश्नावर कायम उपस्थित असणारे जसे की पालेश्वर धरणातील पडलेल्या सुरक्षा भिंतीचे ज्यांच्यामुळे काम सुरू झाले,कोल्हापूर जिल्ह्यातील जेएनपीटी बंदरावर असणारे आपले चाकरमानी यांच्या तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स मधील गैर सोईबाबत नेहमी आवाज उठवत असतात. कामगाराच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर, असे हे व्यक्तिमत्व आहेत.

याआधी पाटील यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना- रायगड जिल्हा सहचिटणीस हे पद होते. मनसे शाहुवाडी तालुका व रायगड विभागातील कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…