Home राजकारण धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्गात) आरक्षण मिळावे: आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्गात) आरक्षण मिळावे: आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

3 second read
0
0
552

शिरोळ: प्रतिनिधी

धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी हा समाज वर्षानुवर्षे संघर्ष करीत आहे. आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने अनेक आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मोठ्या प्रमाणात मेंढपाळ असलेल्या धनगर समाज बांधवांची आर्थिक शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या मागणी पत्राची प्रत त्यांनी शिरोळ तालुक्यातील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला शनिवारी सुपूर्त केली. आपण या कामी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धनगर समाज बांधवांच्या व्यथा आणि त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी शिष्टमंडळातील उपस्थित प्रतिनिधींना सांगितले.

यावेळी अमोल मरळे, शिवाजी बेडगे, बाचू बंडगर, राहुल बंडगर, संजय अनुसे, मल्लाप्पा धनगर, संतोष पडळकर, सुनील बंडगर, अमर पुजारी, रामभाऊ बंडगर, नवनाथ गावडे, तानाजी माने, बाळासो बंडगर, श्रावण गावडे, रामू पुजारी, तुकाराम चिगरे, दत्ता पुजारी, विजय फोंडे, धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…