शिरोळ : प्रतिनिधी
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून चांगले काम केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या विश्वासाने ताकद दिली होती. या निवडणुकीत त्यांना प्रचंड मताने विजयी करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना निश्चित ताकद देतील, असा मुख्यमंत्री साहेबांचा संदेश मी घेवून आलो आहे, त्यामुळे त्यांना सर्वाधिक मताने विजयी करावे, असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्यावर आमदार यड्रावकर यांनी विश्वास ठेवून सहकार्य केले तोच विश्वास सार्थ करून मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्री साहेबांनी यड्रावकर यांना मोठी ताकत देऊन १९०३ कोटींचा विकास निधी दिला यड्रावकर यांनी पै – पै चा हिशोब आपल्या आमदारकीच्या विकासपर्व या प्रगती पुस्तकात दिला आहे, आसे सांगून ते पुढे म्हणाले, आमदार हा लोकप्रतिनिधी असतो गावागावातील समस्या जाणून तो सर्वांगीण विकास करण्याचा त्यानी द्यास घेतलेला असतो तोच लोकप्रतिनिधी म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत. त्याच्या विकास कार्यामुळे या परिसरातील लोक सुखावले आहेत. महापूर काळात यड्रावकरांनी पूरग्रस्तांच्या हिताचे काम करून त्याना दिलासा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मंत्री असताना या जिल्ह्यात दौरा करून पूरग्रस्तांना मदत करून आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवली होती. महाराष्ट्राबरोबरच केरळ मध्येही पूरग्रस्तांना मदत केली आहे. राज्यात एक नंबरचे काम मुख्यमंत्र्यांचे आहे, असा सर्व्हे झाला आहे. असे सांगुन ते म्हणाले ज्यावेळी राजकिय उठाव झाला. त्यावेळी आमदार खासदार व लाखो शिवसैनिक साथ देऊन विश्वास ठेवून मोठी ताकत दिली आहे. त्याचं विश्वासाने कोणावरही अन्याय न करता राजकिय सत्तेत त्यांना वाटा दिला आहे. असे सांगून ते म्हणाले, शिरोळ तालुक्यासह जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवारांचे वातावरण चांगले दिसत असून महायुतीचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामुळे नव्या विकासाची संधी मिळाली आहे या संधीचे सोने करून घेण्यासाठी आमदार यड्रावकर यांना विजयी करून ताकद द्या मुख्यमंत्री पूर्ण ताकद त्याना देतील असे त्यांनी सांगितले यावेळी.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यातील मतदारांच्यामुळे शिरोळ तालुक्यातील विकासासाठी १९०३ कोटीचा निधी मिळाला यामुळे गावागावाचा सर्वांगीण विकास करता आला या विकासा बरोबरच व्यक्तिगत लाभार्थ्यांना देखील शासनाच्या योजनाचा लाभ देण्यात आला यामध्ये लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवून शासनाच्या योजना तळागाळातील लोकांच्या पर्यत पोहचवल्या आहेत असे सांगून त्यांनी शिरोळ गावच्या विकासासाठी १०० कोटी ६२ लाखाचा निधी आणला आहे पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराज याचा पुतळा आनी सीनियर कॉलेज सुरू करणार असल्याचे सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, योगेश खाडे, मल्लाप्पा चौगुले, रणजीत पाटील, मनीषा डांगे, बबन यादव, दशरथ काळे, अमरसिंह पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी उबाठाचे कृष्णात भेंडे, आकाश गायकवाड, अर्चना बिरणगे यांनी उबाठातून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. तर जैनापूर येथील कोळी बांधवांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश केला. तसेच अर्जुनवाड येथील झांबरे ग्रुप, नंदकुमार पाटील, सावकर चौगुले यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठींबा दिला. यासह दानोळी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आमदार यड्रावकर यांना पाठिंबा दिला.
यावेळी सतिश मलमे, प्रमोददादा पाटील, मल्लाप्पा चौगुले, चंद्रकांत मोरे, मुकूंद गावडे, अमरसिंह पाटील, बाबासो वनकोरे, डॉ. नीता माने, राकेश खोंद्रे, श्रीपती सावंत, संजय शिंदे, कैलास काळे, निळकंठ फल्ले, बाबा पाटील, माधुरी टाकारे, एन. वाय. जाधव, रामदास गावडे, बजरंग काळे, बाळासाहेब लडगे, विजय माने देशमुख, सुरज कांबळे, रविंद्र माने, अमर शिंदे, जनार्दन कांबळे, शिवाजी कांबळे, शहाजी गावडे, दिग्वीजय माने, रणजित पाटील, बाळासो शेख, देवाप्पा पुजारी, विजय खातेदार, सिता निकम, आसमा पटेल, शोभा कोळी, आरती गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार बाबा पाटील यांनी मांनले.