Home Uncategorized राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी दिगंबर सकट

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी दिगंबर सकट

4 second read
0
0
73

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदीशिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर सुदाम सकट ( शिरोळ ) यांची निवड करण्यात आली आहे . दरम्यान दिगंबर सकट यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला असून विविध संस्था व व्यक्तींनी सकट यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर येथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सकट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांच्या हस्ते सकट यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे , रफिक नदाफ सचिन शिरगावे श्रेणिक कोगनोळे , शाहिर आवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान बोलताना दिगंबर सकट म्हणाले , राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी सर्वसामान्य घटकासह श्रमिक,कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार आणि राष्ट्रवादी पक्षाचे ध्येय धोरण गावागावात पोहोचवून ‘ गाव तिथे राष्ट्रवादी पक्षाची शाखा निर्माण करणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…