Home Uncategorized शेकाप व मुस्लिम समाजातर्फे सत्कार

शेकाप व मुस्लिम समाजातर्फे सत्कार

3 second read
0
0
380

मलकापूर प्रतिनिधी

शेतकरी कामगार पक्ष व मुस्लिम समाज मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूरचे सुपुत्र अमित कुंभार यांची पोलिस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.सत्कार नरहर मंदिर या ठिकाणी करण्यात आला. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने, शौकत कळेकर, गुलाब भटारी, इसाक म्हालदार, शिवाजीराव पाटील, नामदेव पाटील इ. नागरीक उपस्थित होते. सत्कार प्रसंगी अमित कुंभार यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,

मुलांवर संस्कार करण्याचे काम आपले आईवडील करीत असतात मुलांनीही आपल्या परिस्थीतीची जाणिव ठेवून अभ्यास प्रामाणिक केल्यास असे सत्कार करण्यास दिवस अपुरे पडतील. यावेळी स्वागत भीमसेनेचे प्रकाश कांबळे यांनी व आभार दस्तगीर आत्तार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…