Home Uncategorized गुरव समाज कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी अजय गुरव यांची नियुक्ती

गुरव समाज कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी अजय गुरव यांची नियुक्ती

2 second read
0
0
175

मलकापूर प्रतिनिधी

अखिल गुरव समाज संघटना राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गुरव यांची आज दि. 1 जुलै 2023 रोजी शाहूवाडी येथे बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत जिल्हा व तालुकास्तरीय नियुक्त करण्यात आल्या.

मलकापूरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय गुरव यांची कोल्हापूर जिल्हा गुरव संघटना उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी सदानंद गुरव यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी गुरव समाजातील प्रश्न, समाजाचे एकजुटीकरण या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस शाहुवाडी तालुक्यातील गुरव समाजाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…