Home Uncategorized रोटरी क्लब व शिष्यवर्धिनी प्रतिष्ठान यांच्यावतीने मुलींना सायकल वाटप

रोटरी क्लब व शिष्यवर्धिनी प्रतिष्ठान यांच्यावतीने मुलींना सायकल वाटप

3 second read
0
0
107

मलकापूर प्रतिनिधी

डोंगरी भागातील वंचित घटकातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठीसेवाभावी संस्थांनी शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात असे आवाहन रोटरी क्लबचे प्रमुख संजय मेटे यांनी केले. वारूळ येथे आयोजलेल्या विद्यार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी रमाताई फाटक होत्या. प्रास्तविक केंद्र समन्वयक राजेंद्र लाड यांनी केले.रोटरी क्लब व शिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठान, इचलकरंजी यांच्या वतीने डोंगराळ भागातील ९ मुलींना सायकली वाटप केल्या. नव्वद मुलांना लेखन साहीत्य पुरवले.

यावेळी लेखिका सौ. कविता नेर्लेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विज्ञान, आरोग्य व आहार याबाबत समुपदेशन केले. यावेळी गेलेक्सी फाउंडेशन सुदीप वडिंगे व नितीन गवळी, दत्त पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र कामेरकर, अध्यापक आर.आर.पाटील, विनायक हिरवे , राजाराम पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, महेश कामेरकर, मारूती बोटांगळे आदी प्रमुख उपस्थित होते. आभार तुकाराम मोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…