Home Uncategorized बालकांचे शाहूवाडी पंचायत समोर ठिय्या आंदोलन

बालकांचे शाहूवाडी पंचायत समोर ठिय्या आंदोलन

4 second read
0
0
131

मलकापूर प्रतिनिधी

अमेणी पैकी खोंगेवाडी ता. शाहूवाडी येथील शालेय विद्यार्थांनी शिक्षक मागणीसाठी पंतायत समिती समोर एकदिवशीय ठिय्या आंदोलन केले. लहान विद्यार्थ्यांनीच आज विस्तार अधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले. खोंगेवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत १ ली ते ५ वी पर्यंत वर्ग भरतात, विद्यार्थ्यांचा २५ पट आहे.

दोन शिक्षक लागतात. एक शिक्षक येथे होता परंतु त्यांची बदली झाली. कायमस्वरूपी शिक्षकच मिळत नाही. गेले आठ दिवस येते आलटून पालटून शिक्षक वरिष्ठांच्या आदेशाने शाळेत जात असतात. विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्हाला कायमस्वरपी शिक्षक द्यावेत अन्यथा आम्ही विद्यार्थी पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे बेमुदत उपोषण करु असा संतप्त इशारा विद्यार्थांनी व पालकांनी आज शाहूवाडी पंचायत समित गटविकास अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सांगितले.पुरेशे शिक्षण देण्यास संबंधित विभाग कायम अन्यायी भूमिका घेत आहे.

शाहूवाडी शिक्षण विभागाने ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारा काही पालकांनी आज निवेदनाद्वारे दिला. तालुक्यात २२९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. खोंगेवाडी शाळेला अन्य शाळेतील शिक्षक देण्याची व्यवस्था केली जाईलअसे सौ. रंजना कुंभार व आनंदा सुतारशिक्षण विस्तार अधिकारी यांनी सांगितले. शाहूवाडी तालुक्यातील जागरूक पालकयावेळी संतोष कदम, बाजीराव चौगूले, मंगल कुडापणे, शरद कुडापणे, चंद्रकांत कदम, अनिल कदम, शेखर येडगे, संदिप यादव, शशिकांतयादव, रेखा कदम, रमेश कदम, आनंदा कदम, पांडूरंग कदम आदी सह विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…