Home Uncategorized विशाळगडावर पशुपक्षी हत्या बंदी

विशाळगडावर पशुपक्षी हत्या बंदी

2 second read
0
0
444

मलकापूर प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले विशाळगड या ठिकाणी कोंबडी, बकरे यांची मोठ्या प्रमाणात हत्या होत असून, ग्रुप ग्रामपंचायत गजापूर – विशाळगड यांच्याद्वारे दिलेल्या माहितीनुसार यापुढे पशुपक्षी हत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. विशाळगड किल्ला या संरक्षित ऐतिहासिक स्मारकाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कोल्हापूर व संचालक पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संदर्भीय आदेशान्वये बेकायदेशीर पशुपक्षी हत्या करण्यास मनाई करण्यात आले आहे.

ऐतिहासिक स्मारकाच्या ठिकाणी उघड्यावर विनापरवाना बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात कोंबडी, बकरे यांची कत्तल होत आहे. मोठ्या प्रमाणात दुर्गंधी अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे रोगराई पसरून सामाजिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. येणाऱ्या भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की कत्तलीसाठी विशाळगडावर कोंबडे, बकरे घेऊन जाऊ नये.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…