Home Uncategorized छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन सरुड

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन सरुड

4 second read
0
0
43

मलकापूर प्रतिनिधी

छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या 101 व्या पुण्यतिथी च्या निमित्ताने सरूड तालुका शाहूवाडी येथील शाहू कालीन तळ्यावरती 6 मे 2023 रोजी सकाळी 10 वा. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या तळ्याची निर्मिती खुद्द छत्रपती शाहू महाराजांनी सण 1915 साली करवीर संस्थान बजेट मधून करण्यात आली होती. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारा असा दूरदृष्टी राजा, अशा या राजाला विनम्र आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शेकापचे भाई भारत पाटील, राजाराम मगदूम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, रामभाऊ लाड, पांडुरंग वग्रे (आबा), प्रकाश नाईक सर, बांधकाम संघटनेचे पंचम सुतार, आरपीआयचे अध्यक्ष प्रकाश माने, दलित महासंघाचे प्रदीप माने, अंनिसचे चंद्रकांत रेडेकर व इतर बहुजन समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…