Home Uncategorized महाराष्ट्र पोलीस पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्वाभिमानी संघटना

महाराष्ट्र पोलीस पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्वाभिमानी संघटना

4 second read
0
0
52

महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाराष्ट्र पोलीस पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा बुधवारी दि. 24 मे 2023 रोजी सायंकाळी 5 वा. बांबवडे तालुका शाहुवाडी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थित होणार आहे.

या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, नायब तहसीलदार रविंद्र मोरे, प्राध्यापक प्रकाश नाईक, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ शेट्टी, को. जि. मा. शि. पतसंस्थेचे जिल्हा संचालक प्रकाश कोकाटे, शाहूवाडी तालुक्यातील करिअर ॲकॅडमींचे अल्लाबक्ष मुल्ला, शरद पचकर, संग्राम चौगले, विनायक हिरवे, विनोद भोसले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…