Home वायरल जुळेवाडी खिंडी नजीक भीषण अपघात एक ठार

जुळेवाडी खिंडी नजीक भीषण अपघात एक ठार

4 second read
0
0
3,302

शाहूवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंडीजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला. अपघात रात्री अकराच्या सुमारास घडला असून चालक जागीच ठार झाला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रत्नागिरी पावस हून विजापूर कडे जाणारा चिरावाहतूक ट्रक क्रमांक एम.एच. ०८ एपी ९५९५ शाहुवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंडीजवळील वळणावर रात्री अकराच्या सुमारास चालकाचा ताबा सुटून, ट्रक ३० ते ३५ फूट खाली कोसळला. चालक कलाप्पा सोमशेखर पाटील वय- 24 गाव – तीर्थ, तालुका- दक्षिण सोलापूर याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे शव मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…