Home Uncategorized प्रा.डॉ.एन. डी.पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

प्रा.डॉ.एन. डी.पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

3 second read
0
0
64

मलकापूर:

मलकापूर -पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी .पाटील महाविद्यालयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व आयक्यूयीसी विभागाच्या वतीने ‘इमर्जिंग ट्रेंड्स इन फॅब्रिकेशन ऑफ नॅनो मटेरियल अँड एप्लीकेशन‘ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले आहे.

सदर परिषदेस उद्घाटक व बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. केशव राजपुरे हे उपस्थित राहणार आहेत. रसायनशास्त्र विषयाचे विषय तज्ज्ञ म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एस.एन. तायडे व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागातील डॉ.सर्फराज मुजावर तसेच साऊथ कोरिया तील डॉ. श्रीकांत सदावर हे मार्गदर्शन करणार आहेत. महाविद्यालयाने दिलेल्या प्रसिद्धपत्रकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन .घोलप यांनी म्हटले आहे या राष्ट्रीय परिषदेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे परिषदेचे समन्वयक प्रा. नाईक पी.एस.यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस .बी. पोरे. यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…