Home Uncategorized प्रज्ञा देवार्डे हिचे बँक परीक्षेत यश

प्रज्ञा देवार्डे हिचे बँक परीक्षेत यश

2 second read
0
0
154

मलकापूर प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात असणाऱ्या सवते या गावातील प्रज्ञा मारुती देवार्डे हिने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वर्ग १ अधिकाऱ्यांच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून गावासह तालुक्याचा लौकिक वाढवून तिच्या या नेत्र दीपक यशामुळे तालुक्यातून तिचे कौतुक होत आहे.

सवते या गावातील प्रज्ञाचे प्राथमिक शिक्षण ठमकेवाडी येथे आजोबांच्या घरी झाले. वडील हे कामानिमित्त नाशिक या ठिकाणी असल्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नाशिक मध्ये घेऊन तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर्ग एकच्या अधिकाऱ्यांची परीक्षा देऊन त्यामध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला. या यशासाठी तिला शिक्षक आई, वडील यांचे मार्गदर्शन लाभले. या तिच्या नेत्रदीपक यशामुळे शाहूवाडी तालुक्याचे नाव उज्वल झाले आहे.मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…