कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्रातील ” बेस्ट पॉलिटेक्निक” पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र – गोवा विभागातर्फे हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन नोव्हेंबर रोजी गोवा येथे पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी दिली.डॉ. डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रीत उपक्रम सातत्याने राबविले जातात. …