सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपूर्ण राज्यामध्ये पुढील महिन्याच्या 25 तारखेपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत विघ्नहर्ता गणरायाच्या मूर्ती बसवल्या जातात तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज बिलामध्ये विशेष सूट द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. …
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज बिलामध्ये विशेष सूट द्या; आमदार राजेश क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..