महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील आपटी येथे भव्य भजन महोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून पन्हाळा तालुक्याची समृद्ध वारकरी परंपरा आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा जागर करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त राज्यभर …