नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांचा क्रीडाईच्या वतीने जाहीर सत्कार. कोल्हापूर दि.२६ : पार पडलेल्या निवडणुकीत सुमारे २९ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी वाढली आहे. यामध्ये कुठेही कमी न पडता येणाऱ्या काळात शहरासह जिल्ह्याचे प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याचे प्रतिपादन …