पन्हाळगडावरील 99 वर्षे पूर्ण केलेली जिल्हा परिषदेची सर्वात जुनी शाळा कुमार विद्यामंदिर पन्हाळा येथे आज शालेय व्यवस्थापन समितीची लोकशाही पद्धतीने निवड करण्यात आली. याच कार्यक्रमात भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले यांच्याकडून शाळेला संगणक भेट देण्यात आला.मुख्याध्यापिका रमना चिले यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 3 वाजता सर्व पालकांची बैठक बोलावण्यात आली होती. हात वर करून झालेल्या निवड प्रक्रियेत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शहाबाज …