Home Advertise जोतिबाच्या डोंगरावर या दोन भक्तांनी घेतला अखेरचा श्वास एकाचा दरीत कोसळून मृत्यू तर दुसऱ्याला हार्ट अटॅक

जोतिबाच्या डोंगरावर या दोन भक्तांनी घेतला अखेरचा श्वास एकाचा दरीत कोसळून मृत्यू तर दुसऱ्याला हार्ट अटॅक

3 second read
0
1
766

दख्खनचा राजा जोतिबाची काल पाच एप्रिल 2023 रोजी चैत्र यात्रा वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविकांच्या उपस्थिती पार पडली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी गर्दी असते. या चैत्र यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक तसेच आजूबाजूच्या राज्यातून अंदाजे १५ लाख भाविक उपस्थित राहिल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सांगण्यात आले. गुलालाची उधळण, जोतिबाच्या नावानं चांगभलं चा गजर जोश आणि जल्लोषाचे भक्तीमय वातावरणात पार पडलेले यात्रेत काही ठिकाणी अपघात देखील घडली आणि या अपघातात दोन भाविकांना आपला जीव गमवावा लागला.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील बीड कवडी या गावातून प्रमोद धनाजी सावंत वय वर्ष 20 या भाविकाचा सकाळी दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. प्रमोद डोंगर उतारावर सकाळी सहाच्या सुमारास दक्षिण बाजूच्या डोंगरावरती अंधारात पोहोचला होता उताराचा अंदाज न आल्याने पाय घसरून सुमारे 50 ते 60 फूट दरीत खाली कोसळला उपचारासाठी त्याला सीपीआर येथे दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांच्या कडून कळवण्यात आले.
आणि मुंबईवरून आलेले संजय दत्तात्रय शिंदे वय वर्ष 59 या भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…