
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलकापूर, यांच्यावतीने मनसे चषक 2023 चे आयोजन करण्यात आले. मलकापूर मध्ये मार्केट यार्ड मैदान या ठिकाणी, क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 25 मार्च व 26 मार्च या दोन दिवशी घेण्यात येणार आहे. सदर स्पर्धा ही मनसे मलकापूर शहर उपाध्यक्ष अमोल सोनावळे यांच्या नेतृत्वाखाली भरवण्यातआली आहे. यावेळी मनसे चषक 2023 चे उद्घाटन, सहकार सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सतीश तांदळे, मलकापूर शहर अध्यक्ष अजय गुरव, सामाजिक कार्यकर्ते रमेश नाईक, किरण घेऊदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे उद्घाटन प्रसंगी सांगितले.
