
१८ फेब्रुवारी निमित्त अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवकसंघ आणि अखिल भारतीय सफाई कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनेश्री वटेश्वर मंदिर कावळा नाका,एस.टी स्टँडजवळ,कोल्हापूर येथे मसाला दूध प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.


महाशिवरात्रीचे औचित्य साधून यावेळी अखिल भारतीय श्रीबाल्मीकी नवयुवकसंघ व अखिल भारतीय सफाई कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेशचे सचिव मुकेश लल्लुजी घोर,जिल्हा कार्याअध्यक्ष संदिप बन्से,शहर उपाध्यक्ष विक्रम पंडत,शहर संघटक इंद्रजित मिसाळ, विशाल घोर, बाळासाहेब कवाळे, सागर रजपूत, सुजल पंडत,सौ.रेश्मा राहुल चव्हाण यांच्या वतीने मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.