हातकणंगले ता . १९ अखंड महाराष्ट्र भर शिक्षणाची तेजोमय ज्योत पसरविणाऱ्या कर्मवीरांच्या कुंभोज गावच्या भुमीत एका ऐतिहासिक शिक्षण संस्थेत इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीस शिक्षिकीने ओढत नेऊन अपमाणास्पद गैर वर्तन केल्या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी नम्रता गुरसाळे यांच्याकडे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिरिष थोरात यांच्यासह पिडीत विद्यार्थ्यांनीच्या पालनाकांनी आज लेखी तक्रार केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे .
१२ ऑगष्ट रोजी हा प्रकार घडला होता . संबंधीत विद्यार्थीनीने हि घटना पालकांना सांगितली मात्र संबंधीत शिक्षिका लगतच्या गावच्या एका माजी सरपंचांची नातेवाईक असल्याने गेल्या आठ दिवसापासून हि घटना दडपण्याचा प्रयत्न केला जात होता . मात्र दबक्या आवाजात याची चर्चा लोकांतून चालू होती . मात्र आज संबधित विद्यार्थीनीचे पालक जाऊन रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिरिष थोरात यांना भेटल्या नंतर या विषयाला तोंड फुटले यानंतर गट शिक्षणाधिकारी नम्रता गुरसाळे यांना घडल्या प्रकारांची संपूर्ण माहिती देऊन निवेदन देण्यात आले . यामध्ये सदर प्रकार हा अत्यंत गंभीर असून, विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने या प्रकरणाची तातडीने व संवेदनशीलतेने चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच घटनेशी संबंधित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध असल्यास ते तातडीने ताब्यात घेऊन सुरक्षितरीत्या जतन करावे, जेणेकरून कोणतेही पुरावे नष्ट अथवा बदलले जाणार नाहीत. याची दक्षता घ्यावी,
त्याचप्रमाणे विद्यार्थिनी, तिचे पालक, संबंधित शिक्षिका तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाब नोंदवून संपूर्ण घटनेची वस्तुस्थिती तपासावी.
तक्रारीतील आरोप व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे लागू कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. विशेषतः जातीवरून अपमान केल्याचा आरोप तपासून त्यास लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात यावी. अशा मागण्या करण्यात आल्या असून याची गटशिक्षनाधिकारी नम्रता गुरसाळे यांनी गांभिर्यांने दखल घेऊन केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांना त्वरीत माहिती घेऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .
कोट : घडलेला प्रकार गंभीर असून केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांना त्वरीत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत . अहवाल येताच दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल – नम्रता गुरसाळे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती हातकणंगले
केके न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे



