Home Uncategorized संयुक्त उचतकर यांच्या वतीने महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

संयुक्त उचतकर यांच्या वतीने महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

2 second read
0
3
708

    तळपती ज्योत भगवा झेंडा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असा घोष करत. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आलेले शिवजयंती शाहूवाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली. पन्हाळगड, विशाळगड या ठिकाणाहून ज्योत घेऊन अनेक शिवप्रेमी आले. उचत येतील संयुक्त उचतकर येथील युवकांनी पन्हाळगडावरून ज्योत घेऊन येत मलकापूर येथील सुभाष चौकातील शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले. 

   शाहुवाडी तालुका या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिव जयंतीनिमित्त शिवमय वातावरण झाले होते. उचत येथील मावळ्यांनी पन्हाळगडावरून ज्योत आणली होती. याबरोबरच तालुक्याच्या विविध भागात शिवजयंती निमित्त पन्हाळगड, विशाळगड या ठिकाणावरून ज्योत घेऊन जाण्यासाठी अनेक ठिकाणाहून शिवप्रेमी आले. भगवे झेंडे, छ. शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिवजयंती साजरी केली. शाहूवाडी संपूर्ण तालुक्यात शिवजयंतीचे अवचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात आले. मलकापूर येथील शिवतिर्थ सुभाष चौक या ठिकाणीही  शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…