सिरसे शाखेचे उद्घघाटन मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले व कोल्हापूर शहराध्यक्ष व माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांचे हस्ते पार पडले.
राज ठाकरे यांचे विचार तळागाळात पोहचवा गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता व राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करा, मराठी युवकांसाठी उज्ज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांनी केले.

यावेळी मनसे कोल्हापूर शहराध्यक्ष व माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी मनसे शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तयार असल्याचे सांगितले.
मनसे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी राधानगरी तालुक्यात गावागावात शाखा स्थापन करणार असल्याचे व विविध पदाधिकारी निवडी करणार असून युवकांनी मनसे मध्ये सामील व्हावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी पी एम किसान योजना विषयी माहिती देवून अपात्र शेतकऱ्यांनी मनसे पदाधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे सागितले.
यावेळी गट अध्यक्ष युवराज येडूरे, वाहतूक सेना जिल्हाअध्यक्ष राहुल कुंभार, सिरसे शाखाचे नुतून जनाधार सेना तालुकाध्यक्ष अक्षय पाटील, भुदरगड तालुकाध्यक्ष अशोक पाटील, शहर अध्यक्ष राजेश पाटील, तालुकाउपाध्यक्ष उत्तम चव्हाण, रोहित कानकेकर, तालुका सरचिटणीस प्रशांत सनदी, मराठा कामगार सेना जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अक्षय पोवार, सिरसे शाखा अध्यक्ष सचिन पाटील, शाखा उपाध्यक्ष मंदार भोपळे, तुकाराम कांबळे, जगदीश पाटील, तालुका संघटक प्रवीण मनुगडे, विभाग अध्यक्ष संदीप चव्हाण, उम्मेद निल्ले, सखाराम कांबळे, जगदीश कांबळे ताळगाव, सिरसे गावातील कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आभार अक्षय पाटील पाटील सिरसेकर यांनी मानले .

कोल्हापुरी कारभारसाठी सरवडे प्रतिनिधी राजू राजीगरे


