Home Uncategorized मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

4 second read
0
1
139

पन्हाळा : प्रतिनिधी सचिन वरेकर
पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथील विद्यामंदिर आकुर्डेचे मुख्याध्यापक श्री बाबुराव आकाराम पाटील हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवेनिमित्त गौरवपूर्ण निरोप व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी जि. प. कोल्हापूर मा. डॉ. मीना शेंडकर मॅडम, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पन्हाळा मा. श्री शिवाजी मानकर, शिक्षण विस्तार अधिकारी मा. दबडे मॅडम व मा. के. एस. पाटील, तसेच शिक्षक समितीचे जिल्हा नेते मा. श्री कृष्णात कारंडे, महिला अध्यक्षा मा. संगीता अस्वले, शिक्षक नेते मा. रामदास झेंडे व मा. श्री दिलीप बच्चे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजगावच्या सरपंच मा. पूजा सुतार, केंद्र समन्वयक श्री शिवाजी पाटील (वाघुर्डे) व श्री तानाजी घरपणकर (पुनाळ) यांच्यासह तालुक्यातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणाऱ्या पाटील सरांच्या सेवेला यावेळी निरोप देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

ईद-ए-मिलादनिमित्त आगा परिवार व समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने पन्हाळगडावर विविध धार्मिक, …