Home Uncategorized आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत करिअर शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत करिअर शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

4 second read
0
0
9

शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ येथे साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था व पंचायत समितीच्या वतीने तालुका करिअर शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, कोल्हापूर जिल्हा शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, उपशिक्षणाधिकारी प्रितेश वाघ, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका शिक्षणाधिकारी भारती कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
साने गुरुजी पतसंस्थेच्या चेअरमन सुरेखा कुंभार, व्हाईस चेअरमन बोरचाटे मॅडम, कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन अरविंद मजलेकर यांच्यासह पतसंस्थेच्या संचालक मंडळ व स्टाफ यांचा यामध्ये सहभाग होता. शिरोळ तालुक्यातील प्राथमिक विभागातील शिक्षक आणि शिक्षिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. परिषदेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना, मार्गदर्शन आणि करिअर घडविण्यासाठी आवश्यक त्या कौशल्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणातील बदलत्या स्वरूपावर भर देत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साने गुरुजी पतसंस्थेच्या सर्व संचालक व शिक्षक वर्गाने विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाचे केंद्र म्हणजे ब्रिलीयंट स्कूल ; आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन

शिरोळ : प्रतिनिधीरंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कूल शिरोळ य…