Home Uncategorized आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने कोथळी–नंदगाव रस्ता खुला : शेतकऱ्यांकडून आमदार यड्रावकर यांचा सत्कार

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने कोथळी–नंदगाव रस्ता खुला : शेतकऱ्यांकडून आमदार यड्रावकर यांचा सत्कार

3 second read
0
0
48

शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकाराने व प्रशासनाच्या सहकार्याने कोथळी येथील मगदूम मळा ते नंदगाव (नंदीवाले वसाहत) दरम्यानचा दीर्घकाळ प्रलंबित रस्ता खुला करण्यास गती मिळाली आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले असून, वाहतुकीसाठी लवकरच रस्ता पूर्णपणे सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोथळी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार यड्रावकर यांचा सत्कार करत त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आमदार यड्रावकर यांनी रस्त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल व भूमापन विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी केली. दोन्ही बाजूंना सहा फूट जागा सोडून एकूण बारा फुटी रस्त्याची आखणी करण्यात आली आहे. हद्द निश्चित करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली होती. सायंकाळी अंधारामुळे काही काळ काम थांबवावे लागले असले, तरी उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

नंदीवाले वसाहतीकडे जाणाऱ्या या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होत होती. या मागणीसाठी विविध स्तरांवर आंदोलनेही झाली होती. यापूर्वीच मोजणी व हद्द निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होताच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले.

दरम्यान, रस्ता मोकळा करण्यासाठी संबंधित शेतकरी व इतर घटकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी नारळाची झाडे, शेड व शेतीवरील अतिक्रमण आढळून आले होते. मात्र, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या मध्यस्थीने सामंजस्याने तोडगा काढत अतिक्रमण हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रसंगी संजय नांदणे, राजगोंडा पाटील, भरतेश खवाटे, विजय खवाटे, बाहुबली इसराण्णा, विजय दळवी, विजय शिंदे, अशोक पुजारी, राजू विभुते, शरद कांबळे, बंडा माणगावे, नितीन वायदंडे, विलास कोरवी यांच्यासह प्रकाश नंदीवाले, महेश नंदीवाले, भाऊसो मगदूम, अण्णासो चौगुले, विजय वसगडे व नंदीवाले समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…