Home Uncategorized महापूर व कोरोना काळात साथ देणाऱ्यांना संधी देणार ; एक मत सीमाताईसाठी यांच्यासाठी – मतदारांचा निर्धार

महापूर व कोरोना काळात साथ देणाऱ्यांना संधी देणार ; एक मत सीमाताईसाठी यांच्यासाठी – मतदारांचा निर्धार

4 second read
0
0
25

महापूर व कोरोना काळात साथ देणाऱ्यांना संधी देणार, एक मत सीमाताईसाठी मतदारांचा निर्धार

शिरोळ : प्रतिनिधी

अर्जुनवाड येथील म्हैशाळे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत संकटाच्या काळात केलेले कार्य आजही सर्वसामान्य नागरिकांच्या स्मरणात आहे. २०१९ मधील महापूर असो वा २०२०-२१ मधील कोरोना महामारी,या प्रत्येक आपत्तीच्या काळात म्हैशाळे कुटुंबीय गरजूंसाठी आधारवड ठरले.

महापूर काळात अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना अन्नधान्य, कपडे, औषधे यांची मदत करत शिवाजी म्हैशाळे व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रत्यक्ष कामातून सामाजिक जबाबदारी निभावली. विशेषतः कोरोना काळात शासनाने घातलेल्या कडक बंदी आदेशांदरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या.अशा परिस्थितीत आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून स्वतः पुढाकार घेत शिवाजी म्हैशाळे यांनी गट-तट बाजूला ठेवून गरजूंना त्यांच्या घरापर्यंत जाऊन मदत पोहोचवली. औषधोपचार, किराणा सामान, दैनंदिन गरजा यासाठी धावपळ करणाऱ्या नागरिकांना प्रशासन आणि नियमांच्या चौकटीतून मार्ग काढून देण्याचे धाडस त्यांनी दाखवले.

प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधत अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला.त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली. या सामाजिक कार्यामुळे चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, हसूर आदी गावांतील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत.पक्षभेद विसरून समाजहितासाठी काम करणाऱ्या म्हैशाळे कुटुंबीयांचे योगदान सर्व स्तरांतून कौतुकास्पद मानले जात आहे.

आगामी अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौ.सीमा म्हैशाळे यांना एक मत देणार असल्याचे मतदारांकडून व्यक्त होत आहे. संकटाच्या काळात साथ देणाऱ्यांना संधी देण्याची भूमिका अनेक मतदार घेत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…