Home Uncategorized मानोली येथील सड्यावर तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण

मानोली येथील सड्यावर तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण

3 second read
0
0
53

मलकापूर प्रतिनिधी

मानोली ता. शाहुवाडी येथे सड्यावर इंग्रज सरकारने 25 डिसेंबर 1942 रोजी उभारलेल्या भूमापन स्थळाचे स्मरण म्हणून सालाबाद प्रमाणे शाहूवाडी च्या तहसीलदार सीमा सोनवणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. वर्षानुवर्ष इंग्रजांनी उभारलेल्या भूमापन स्थळाचे स्मरण म्हणून 25 डिसेंबर रोजी येथे महसूल च्या वतीने ध्वजारोहण केले जाते.

मानोली तालुका शाहूवाडी येथील येथील सड्यावर ब्रिटिश सरकारने मुख्य भूमापन स्थळ म्हणून येथून मोजणीची सुरुवात केली होती. विशाळगडच्या मुख्यमार्गापासून दूर पाच किलोमीटरवर जंगलात हे सड्यावर ठिकाण आहे पायवाटेने काट्याकुट्यातून आणि घनदाट जंगलातून या स्थळापर्यंत येथे जावे लागते शासकीय अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ पदाधिकारी यांची घनदाट जंगलातून वाट काढत भूमापन स्थळाकडे दोन तास पायपीट केली सुरू झाली.

यावेळी नायब तहसीलदार प्रदीप जाधव, मंडळाधिकारी त्रिवेणी पाटील, वनस्पती शास्त्रज्ञ पांडुरंग बागम प्रा प्रकाश नाईक ,अजिंक्य कुंभार ,प्रवीणकुमार कांबळे आदींनी या दिवशी मनोगते व्यक्त केली. शाहूवाडी च्या तहसीलदार गुरुवारी रुजू झाल्या होत्या शाहूवाडी च्या तहसीलदार सीमा सोनवणे यांचा पद कार्यवाहीचा काल गुरुवारी पहिलाच दिवस होता नाताळची सुट्टी असूनही त्यांनी या भूमापन स्थळावर जाण्यासाठी सुमारे दहा किलोमीटरची जंगलातून पायपीट केली. आणि त्यांनी हा शासकीय सार्वजनिक कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत पार पाडला त्यामुळे तहसीलदार सीमा सोनवणे यांच्यासाठी ड्युटीवरील पहिला दिवस स्मरणीय ठरला त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ पणाचे उपस्थितीकडून विशेष कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…