Home Uncategorized काँग्रेसकडून ३२९ जणांनी दिल्या मुलाखती, दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी मागितली उमेदवारी

काँग्रेसकडून ३२९ जणांनी दिल्या मुलाखती, दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी मागितली उमेदवारी

3 second read
0
0
45

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ३२९ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस कमिटीत दुसऱ्या दिवशी झालेल्या या मुलाखतीत प्रभाग क्रमांक ११ ते २० मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांत काँग्रेसकडे ३२९ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली. मंगळवारी १३५ जणांनी मुलाखत दिली होती. गत महापालिकेत काँग्रेसने सत्ता काबीज केली होती. त्यामुळे काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे. प्रभाग मोठे झाल्याने अनेक इच्छुकांना आपल्या स्वप्नांवर पाणी फेरावे लागत असले तरी तुम्ही जो निर्णय द्याल तो आमच्यासाठी अंतिम असेल असे सांगत सर्वच प्रभागांमधील इच्छुक कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना आश्वस्त केले. माजी आमदार ऋतुराज पाटील, सचिन चव्हाण, आनंद माने, राजू लाटकर,भारती पोवार, सरलाताई पाटील, भरत रसाळे यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…