Home Uncategorized वारणा दूध संघाच्या दही,टेबल बटर, सुगंधी दूध,वारणा आईस्क्रीमच्या अत्याधुनिक प्रकल्पांचा शुभारंभ

वारणा दूध संघाच्या दही,टेबल बटर, सुगंधी दूध,वारणा आईस्क्रीमच्या अत्याधुनिक प्रकल्पांचा शुभारंभ

3 second read
0
0
61

अमृतनगर येथील वारणा सहकारी दूध संघाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने उभारणी केलेल्या दही,सुगंधी दूध,टेबल बटर,वारणा आईस्क्रीम,जलशुध्दीकरण या विविध नव्या प्रकल्पांचे उदघाटन आम.कोरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार विनय कोरे यांनी आगामी काळात आणखी आधुनिक प्रकल्प उभारणी करून अधिक व्यापक स्तरावर व्यवसाय वाढीसाठी संघ व्यवस्थापनाचा मानस असल्याचे सांगितले. तर उपाध्यक्ष एच.आर जाधव यांनी बोलताना संघाकडे कमी वेळेत अधिक दर्जेदार उत्पादने उत्पादित करता येणार असल्याने व्यवसायात कमी खर्चात अधिक काम करता येणार आहे. या प्रकल्पाची संघाच्या व्यवसाय वाढीस अधिक चांगल्या प्रकारे मदत होणार असल्याचे सांगितले.
येत्या काळात अधिक व्यापक आणि तंत्रज्ञान समृद्ध आधुनिक प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील,वाहतूक संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील, संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर,
सर्व संचालक,वारणा उद्योग समुहातील पदाधिकारी,संस्थाचे संचालक मंडळ, पदाधिकारी, सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…