Home Uncategorized संविधानाचे रक्षण करणे सर्व भारतवासियांचे कर्तव्य ; पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांचे प्रतिपादन… जयसिंगपूर येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

संविधानाचे रक्षण करणे सर्व भारतवासियांचे कर्तव्य ; पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांचे प्रतिपादन… जयसिंगपूर येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

3 second read
0
0
39

जयसिंगपूर : कुणाल कांबळे

देशातील अनेक धर्म जाती रूढी परंपरा यांना एकत्र आणून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिले आहे. या संविधानाचे रक्षण करणे आम्हा सर्व भारतवासी यांचे कर्तव्य आहे असे मत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी व्यक्त केले.

जयसिंगपूर येथील भारतीय संविधान गौरव समिती आणि जयसिंगपूर नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने क्रांती चौकात आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमरदीप कांबळे होते.

यावेळी नगरपरिषद बांधकाम अभियंता रामचंद्र कुंभार, निखिल पाटील विद्युत विभागाचे रमेश कांबळे शिवाजी कांबळे,आरोग्य विभागाचे अभियंता संदीप कांबळे यांच्यासह पालिका अधिकारी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नपा शिक्षण मंडळाचे मेघन देसाई यांनी तर स्वागत माझी प्राचार्य धनंजय कर्णिक यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमास रमेश शिंदे, विद्याधर बिडकर मिलिंद भिडे, सुनील चिपरीकर अरविंद धरणगुत्तीकर यांच्यासह शहरातील शाळा हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार एनसीसी विभागाचे प्रमुख श्री भोसले सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…