Home वायरल मुरगूड मध्ये प्रथमच दुर्गा दौड चे आयोजन..!

मुरगूड मध्ये प्रथमच दुर्गा दौड चे आयोजन..!

2 second read
0
1
158

नवरात्रीनिमित्त मुरगूड शहरामध्ये राणा प्रताप कला क्रीडा मंडळ तर्फे दुर्गा दौड चे आयोजन करण्यात आले आहे दररोज सकाळी साडेपाच वाजता दुर्गा दौड निघत असते. यामध्ये सर्व महिला पुरुष तरुण तरुणी लहान मुले उत्साहाने सहभागी होत असतात. येथील राणा प्रताप चौकापासून सुरू झालेला दुर्गा दौड ही ग्रामदैवत अंबाबाईच्या मंदिरात आरतीसाठी थांबते त्यानंतर मुरगुड येथील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या दौडीचे विसर्जन होते. सकाळी राणाप्रताप येथे भगव्या ध्वजाचे पूजन केले जाते तेथून मुख्य बाजारपेठ मार्गे गाव भागातून ग्रामदैवत अंबाबाई मंदिरापासून परत शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यासमोर ही दौड येते.

दौडी दरम्यान देवीचे पद्य, देशभक्तिपर गीते, शिवाजी महाराजांवरील गिते,

जयघोष करत दौड ग्रामदैवत अंबाबाई मंदिराकडे जाते मंदिरात आरती झाल्यानंतर पुन्हा त्याच मार्गे शिवतीर्थ येथे येऊन समारोप करून उद्याचे नियोजन तसेच दौडी विषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी माहिती सांगितले जाते . सुरुवातीला आठ तरुणांच्या मधून सुरू झालेली ही जोडीला आज शंभरच्या घरात तरुण हजेरी लावत असतात यानिमित्त नऊ दिवस भक्तिमय वातावरण निर्मिती होते. ठिकठिकाणी पायावर पाणी घालून तसेच रांगोळी काढून या दौडिचे स्वागत केले जातेकागल तालुका प्रतिनिधी ओंकार पोतदार
दुर्गा दौड मध्ये सहभागी झालेले नागरिक..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…