Home Uncategorized मलकापूर मध्ये दुर्गामाता दौड सुरू

मलकापूर मध्ये दुर्गामाता दौड सुरू

2 second read
0
0
124

मलकापूर प्रतिनिधी:

शारदीय नवरात्रौत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने दररोज दुर्गामाता दौड सुरू आहे. घटस्थापनेपासून या दौडीला प्रारंभ झाला असून यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मलकापूरचे कार्यवाह प्रदीप पवार यांनी केले आहे.देव, देश, धर्मासाठी काम करण्याची इच्छा, आकांक्षा, लढाऊपणा आजच्या तरुण पिढीत यावा. तसेच असेतू हिमाचल काश्मीर ते कन्याकुमारी हिंदुस्थान अखंड रहावा, यासाठी हजारो तरुणांनी भगवा ध्वज व शस्त्र हातात धारण करून दुर्गामाता, भारतमाता व धर्मवीरांचा जयघोष करत तुळजाभवानी देवीच्या पायाशी मागणे मागण्याचा कार्यक्रम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात केला जातो.

त्याला श्री दुर्गामाता दौड असे म्हटले जाते. ही दौड मलकापूर शहरातही घटस्थापनेपासून सुरू असून दसऱ्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबर रोजी समारोप होणार जाणार आहे. ही दौड दररोज शहराच्या विविध भागातून जाणार असून शहरातील मंदिर, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी स्थापित केलेल्या देवीची आरती केली जाणार आहे. यावेळी महिला, नागरिकांकडून ठिकठिकाणी रांगोळी काढून व फुलांचा वर्षाव केला जातो. त्यामुळे रोज पहाटे ६.३० वाजता येथील शिवतीर्थ चौकात युवक भगवा फेटा किंवा पांढरी टोपी घालून उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…