गुप्त बैठका आणि पडद्यामागील राजकारण यामुळे यंदाची हुपरी गावची नगरपरिषद निवडणूक रंगतदार बनलेले आहे, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी सरपंच मंगल राव माळगे यांचे नाव निश्चित झाले असून काल दि 14नोव्हेंबर रोज काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष लालासो देसाई यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी ची शहरांतर्गत ताकद वाढली आहे,काही दिवसांपूर्वी सतेज पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष गणेश वाईंगडे यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे हुपरी गावातील राजकारणास एक वेगळी कलाटणी मिळाली होती काँग्रेसमधील या दोन मातब्बरांना आपल्या गोटात आणल्यामुळे भारतीय जनता पार्टीची हुपरीतील ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांकडून स्वबळाचा नारा दिल्याच्या चर्चा गावात रंगत आहेत तसेच अनेक राजकीय पक्षांकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याच्या चर्चा आहेत अंबाबाई विकास आघाडी यांचेकडून सुनील धोंगडे यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करण्याची शक्यता असून भारतीय जनता पार्टी कडून नगराध्यक्ष पदाचा चेहरा मंगलराव माळगे यांच्या रूपाने स्पष्ट झाला आहे त्यामुळे अंबाबाई विकास आघाडी व भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांकडून प्रचारात मुसंडी घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे
Kk न्यूज साठी हुपरीहुन सुलतान नदाफ



