Home राजकारण विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने सांगलीत कार्यकर्ते आक्रमक : चक्क काँग्रेस शब्दचं टाकला पुसून

विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने सांगलीत कार्यकर्ते आक्रमक : चक्क काँग्रेस शब्दचं टाकला पुसून

2 second read
0
0
103

दि : १० एप्रिल २०२४

सांगली लोकसभा मतदार संघातून विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव केला. त्यानंतर सांगलीमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस शब्द पुसून टाकला.

विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला रंग लावत काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी पुसून टाकला. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर उल्लेख होता. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस शब्द पुसून टाकला.

सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयावरील काँग्रेस नाव पुसण्याआधी मिरजमधील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व तालुक्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून पाहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…