शिरोळ : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कमी जागा मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिरोळचे माजी आमदार उल्हास दादा पाटील यांनी नगरपालिका, महापालिका निवडणुकांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सन 2014 मध्ये ते शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले होते, तर 2024 मध्ये त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या प्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे गटाला मोठा नेता मिळाल्याची चर्चा आहे.


