Home Uncategorized विश्व वारणा पब्लिक स्कूल अँड जुनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

विश्व वारणा पब्लिक स्कूल अँड जुनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

2 second read
0
1
51

हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच प्रशालेमध्ये दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
लेझीम वाद्याच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करून दसरा सणाचे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्व विशद करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके, संस्थेचे सचिव डी.पी.पाटील यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना दसरा विजयाचा संदेश आचरणात आणण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून दसऱ्याच्या परंपरा, संस्कार व प्रेरणादायी विचार मांडले.
यावेळी उपस्थित पालकांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.दसरा महोत्सवाच्या निमित्ताने विद्यालय परिसरात आनंदी व प्रेरणादायी वातावरण तयार झालं होतं.
यावेळी मुख्याध्यापक दीपक महाडिक,संचालिका डॉ.दीपिका महाडिक,संचालिका व्ही.डी.पाटील,श्रीराम करे,एस.डी. काळे,एल.एस.खोमणे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…