Home Uncategorized हुपरी आरोग्य केंद्रात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ संपन्न

हुपरी आरोग्य केंद्रात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ संपन्न

4 second read
0
1
108

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून हुपरी आरोग्य केंद्रामध्ये दि 28 सप्टेंबर रोजी आयुष्यमान भव सेवा पंधरवडा अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार आरोग्य अभियान आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये बिस्मिल्ला फाउंडेशनच्या वतीने क्षयरोग रुग्णांना फुड किट देऊन सहा महिन्यांकरता दत्त घेण्यात आले,
त्याचबरोबर या शिबिरामध्ये लहान मुलांची तपासणी, महिलांची तपासणी, शालेय मुलींच्या रक्ताची तपासणी, बीपी, शुगर तपासणी करण्यात आली या अभियानांतर्गत रेंदाळ व रांगोळी या ठिकाणच्या अनेक रुग्णांची तपासणी यावेळी करण्यात आली यावेळी बिस्मिल्ला फाउंडेशन यांचे कडून घेण्यात आलेल्या या उपक्रमाची विशेष कौतुक यावेळी करण्यात आले यावेळी रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य मेहबूब मुजावर,शाहरुख नायकवडे,अमन हकीम,नारायणदास सपाटे,साहिल अत्तार, शहनवाज मुजावर,सोहेल हकीम,रशीद मुल्ला,गणेश कुंभार, इमरान पिंजारी,आयान मुजावर,अमन मुजावर, सरफराज खलिफा,रोहित गवळी, आदिनाथ पुजारी, व बिस्मिल्ला फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…