Home Uncategorized सभासदांच्या विश्वासावरच संस्थेची अल्पावधीत भरारी : चेअरमन पोपट चौगुले ; शिरटी येथे प्रकाश पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

सभासदांच्या विश्वासावरच संस्थेची अल्पावधीत भरारी : चेअरमन पोपट चौगुले ; शिरटी येथे प्रकाश पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

3 second read
0
1
118

“आपल्या गावची, आपलीच पतसंस्था” ही ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या प्रकाश संस्थेने नेहमीच गोरगरिब, कष्टकरी, सर्वसामान्यांचा विचार केला आहे. त्यामुळे सभासदांच्या विश्वासावरच संस्थेने अल्पावधीतच भरारी घेतली आहे. सन २०२४ – २५ या अहवाल सालात संस्थेच्या एकूण ठेवी २८ कोटी ४६ लाख इतक्या असून कर्जे २० कोटी ७३ लाख इतकी आहेत. संस्थेची गुंतवणूक १२ कोटी १ लाख इतकी असून निव्वळ नफा २१ लाख ९३ हजार, इतका झाला आहे. सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करण्यात असल्याची माहिती, चेअरमन पोपट पोपट चौगुले यांनी दिली.
शिरटी येथील प्रकाश प्रकाश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सभा खेळीमेळीत येथील जैन संस्कृतिक सभागृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी धनाजी भोसले होते.

स्वागत व प्रास्ताविक संचालक अप्पासो मगदूम यांनी केले. अहवाल वाचन व्यवस्थापक अण्णासो मगदूम यांनी केले. दरम्यान, १० वी बोर्डाच्या परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रमुख पाहुण्यांचा हस्ते करण्यात आला. तसेच प्रगतशील शेतकरी अशोक चौगुले यांचा शेती क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीबद्दल, महावीर खवाटे यांना दक्षिण भारत जैन सभेच्या इचलकरंजी येथील जैन बोर्डिंगच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल, तसेच सामाजिक कार्यात महत्वाचे योगदान देणारे आणि आई वृद्धाश्रम संस्थेमार्फत आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल चंदूकाका सराफ ज्वेलर्सचे मॅनेजर महावीर पाटील, आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य रामदास भंडारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी चेअरमन पोपट चौगुले, व्हा. चेअरमन सूर्यकांत उदगावे, संचालक बापुसो पाटील, अण्णासाहेब सुतार, सुरेखा उदगावे, कुबेर मगदूम, बापू रोजे, विश्वास कांबळे, जीनपाल शिरगावे, अप्पासो मगदूम, महावीर खवाटे, सूरज पाटील, संजयकुमार बंडगर, सल्लागार राजकुमार कोगनोळे, शांतीनाथ चौगुले, व्यवस्थापक अण्णासो मगदूम यांच्यासह सर्व सभासद, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सचिन खोबरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…