Home Uncategorized माधुरी संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी आमदार यड्रावकर व आमदार आवाडे यांची चर्चा : याचिका लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न

माधुरी संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी आमदार यड्रावकर व आमदार आवाडे यांची चर्चा : याचिका लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न

3 second read
0
0
100

जयसिंगपूर : कुणाल कांबळे
नांदणी मठाची लाडकी माधुरी उर्फ महादेवी हत्ती लवकरच गावात परत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी लवकर व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला तातडीच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर नांदणीत वनताराचे हत्ती संगोपन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी बुधवारी वनतारा व्यवस्थानाला दिले असून, हत्तीच्या पुनर्वसनाचा मार्ग अधिक सोपा झाला असल्याची माहिती माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार राहुल आवाडे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपूर्वी वनताराच्या तज्ज्ञ टीमने नांदणी येथे पाहणी केली होती. या पाहणीनंतर त्यांनी नांदणीची जागा हत्ती संगोपनासाठी योग्य असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नांदणीतच हत्ती संगोपन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वनतारा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने संगोपन केंद्र सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार राहुल आवाडे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काल बुधवारी या विषयावर चर्चा केली. या चर्चेत दोन्ही आमदारांनी जनतेच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या. नागरीकांचे माधुरी हत्तीशी घट्ट भावनिक नाते असल्याचे आहे. माधुरी हत्ती नांदणी मठाशी आणि येथील धार्मिक परंपरांशी जोडलेली आहे. आता ती परत येणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावकऱ्यांच्या मते, माधुरी फक्त एक प्राणी नसून गावाच्या परिवारातील एक महत्त्वाचा सदस्य आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या लवकरात लवकर सुनावणी झाल्यास माधुरीचे नांदणीत परतणे केवळ भावनिकदृष्ट्या नाही तर कायदेशीरदृष्ट्याही सुरक्षित होईल. राज्य शासन, वनतारा विभाग आणि नांदणी मठ यांच्या एकत्रित प्रयत्न सुरु आहे. राज्य शासनाच्या पुढाकारामुळे हे शक्य होत आहे. माधुरी हत्ती लवकरच आपल्या नांदणी गावी परतणार, असा आम्हाला विश्वास आहे, असे आमदार यड्रावकर व आमदार आवाडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…