
हुपरीत दिवाणी व फौजदारी न्यायालय व्हावे..हुपरी वकील संघटनेने केली निवेदनाद्वारे मागणी…
पट्टण कोडोली (प्रतिनिधी) :- हुपरी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावांची लोकसंख्या साधारणतः तीन लाखाहून अधिक आहे.लोकसंख्येचा विचार करता येथे दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या तक्रारी प्रकरणाचे प्रमाण बहुतांश आहे.त्यामुळे हुपरी परीसरातील नऊ ते दहा गावांसाठी स्वतंत्रपणे दिवाणी व फौजदारी चे न्यायालय व्हावे या मागणीचे निवेदन हुपरी परिसरातील वकील संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गडकरी यांना देण्यात आले.
हुपरी पोलीस ठाण्या अंतर्गत तसेच सभोवताली हुपरी सह रेंदाळ, यळगुड,इंगळी,पट्टण कोडोली,तळंदगे,रांगोळी, जंगमवाडी आदी गावांचा समावेश होतो.हुपरी नगरपरिषद असल्याने आणि येथील भागात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे खटल्यांचे प्रमाण बहुतांश आहे.त्यामुळे येथील नागरिक व पक्षाकरांना हातकणंगले आणि इचलकरंजी जाण्यायेण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने येथील पक्षकरांची गैरसोय थांबावी यासाठी हुपरीत स्वतंत्र रित्या दिवाणी कनिष्ठ स्तर व फौजदारी प्रथम वर्ग न्यायालय व्हावे या मागणीचे निवेदन आज हुपरी परिसरातील वकील संघटनेच्या वतीने इचलकरंजी येथील बार असोसिएशनच्या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गडकरी यांना देण्यात आले.यावेळी अँड. विजयकुमार इंग्रोळे ( कृती समिती अध्यक्ष)अँड. निता परिट,अँड. गिता सोनुले
अँड. वैशाली शिराळे अँड. बी. ए. देसाई अँड. भिमसेन कांबळे अँड. शिवाजी तोडकर अँड. रेश्मा जामकर व इतर वकिल उपस्थित होते.


